कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी सकाळी कोल्हापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. ‘पुढारी‘ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी चाफ्याचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित खासदार धनंजय महाडिक. दुसऱ्या छायाचित्रात स्वागत करताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Fadnavis Kolhapur visit | विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर रविवारी सकाळी स्वागत करण्यात आले. फडणवीस यांचे समवेत विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे सकाळी पावणे दहा वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, 'पुढारी' माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

कोल्हापूर आणि सांगली येथील विविध कार्यक्रमांसाठी फडणवीस यांचे सकाळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रवासी विमानाने प्रवास

मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर हे मुंबईहून नियमित येणाऱ्या प्रवासी विमानाने कोल्हापुरात आले. रात्री ते मोटारीने पुण्याकडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT