कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात आयोजित महामेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आ. डॉ. विनय कोरे, माजी आ. प्रकाश आवाडे, डॉ. स्मिता जाधव आदी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

CM Devendra Fadnavis | शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सक्षम उमेदवार

कोल्हापुरात महामेळावा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन येथे भाजप-महायुतीतर्फे आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिक्षक मतदारसंघातून सर्वात कमी वयाचा आमदार निवडून देण्याचा विक्रम कोल्हापूरकरांना करता येणार आहे. ते कोल्हापूरचे उमेदवार असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. विधान परिषद हे धोरणे व निर्णयांची चिकित्सा करणारे वरिष्ठ सभागृह आहे. शिक्षकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यांची सोडवणूक करण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी आवश्यक आहे. गावडे यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उमेदवार कौस्तुभ गावडे म्हणाले, शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, प्रलंबित मागण्या, संस्थाचालकांच्या अडचणी व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शिक्षक व संस्थाचालक यांच्यात समन्वय साधून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी काम करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या भैया माने, रोहित राऊत, एस. व्ही. पाटील, विजयसिंह माने व अमृता पुजारी यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त केले. मेळाव्यास महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, भाजयुमोचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन नाईक आदी उपस्थित होते.

वेळ पडल्यास रात्री १२ वाजता मुख्यमंत्र्यांना फोन करू

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. गरज पडल्यास रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांना फोन करून शिक्षकांचे काम करून घेण्याची तयारी ठेवली आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असेल, असेही कौस्तुभ गावडे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT