अकरावी प्रवेश : पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका 
कोल्हापूर

अकरावी प्रवेश : पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका

भाग 1, 2 अर्ज प्रक्रिया सुरू; जिल्ह्यात 70 हजार 690 जागा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोमवारपासून भाग 1 व 2 भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी सुरुवातीचे काही काळ सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

माध्यमिक व उच्च शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शून्य फेरी व नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. त्यानुसार 11 मे पासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळपासून विद्यार्थी, पालकांची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नेटकॅफेवर गर्दी पाहायला मिळाली. राज्यात एकाचवेळी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व्हर डाऊन होता. यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ ताटकळत बसावे लागले. त्यानंतर काही तासांनी सर्व्हर सुरू झाल्यावर अर्ज भरले गेले.

अकरावी प्रवेशांतर्गत 11 ते 13 मे या कालावधीत शैक्षणिक पात्रता माहिती, भाग 2 ऑनलाईन अर्ज करणे, कनिष्ठ महाविद्यालये प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया चालेल. 14 व 15 मे रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी व त्यानंतर 16 मे रोजी गुणवत्ता यादीवर हरकती, तक्रार निवारण प्रक्रिया होईल. 18 व 19 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी, अल्पसंख्याक, इन हाऊस कोटासाठी झिरो राऊंडसाठी महाविद्यालय यादी व रिक्त जागा प्रदर्शित केली जातील. 20 मे रोजी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा : 291 महाविद्यालये

प्रवेश जागा उपलब्ध : 70 हजार 690

विज्ञान शाखा : 32 हजार 10

वाणिज्य : 16 हजार 330

कला शाखा : 22 हजार 350

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT