उचगावात दोन गटांत राडा File Photo
कोल्हापूर

उचगावात दोन गटांत राडा : सहा जखमी; 21 जणांना अटक

लहान मुलांच्या फुटबॉल खेळण्याच्या वादातून प्रकार

पुढारी वृत्तसेवा

गांधीनगर : लहान मुलांच्या फुटबॉल खेळण्यावरून बुधवारी रात्री उचगाव (ता. करवीर) येथे दोन गटांत दगडफेक, काठी, पाईप, विटा यांचा वापर करून हाणामारी झाली. यात दोन्ही गटांचे सहाजण जखमी झाले. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून, दोन्ही गटांतील 21 जणांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.

श्रेयस कांबळे, सुबोध भोसले, प्रणव चौगुले, संस्कार बिरांजे विशाल चौगुले व वैशाली कृष्णात चौगुले जखमी झाले. याप्रकरणी करण श्रीकांत चौगुले, विश्वनाथ ऊर्फ साहील देवानंद बिरांजे, वैभव श्रीकांत चौगुले, सूरज सदानंद बिरांजे, रोहित ऊर्फ बबलू अशोक तिवडे, दादासो सीताराम चौगुले, विशाल कृष्णात चौगुले, रोहित प्रमोद चौगुले, सारंग नागेश चौगुले, हर्षद दादासो चौगुले, शैलेश दादासो चौगुले, संस्कार जिदेश बिरांजे व इतर अनोळखी तीन ते चारजण तसेच श्रेयश विनोद कांबळे, ऋत्विक मनोज माने, अनिकेत शशिकांत भोसले, अभिषेक अजय सनदे, साहिल निंबाजी भोसले, अमन अरुण काळे, शुकेश तानाजी भोसले, अक्षय अशोक कांबळे, अमोल राजू कांबळे, दीपक राजू कांबळे, विनोद अशोक कांबळे, सुबोध ऊर्फ बंटी जनार्दन भोसले, तानाजी भोसले (सर्व रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) तसेच इतर 3 ते 4 अनोळखी जणांवर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT