नानीबाई चिखली : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चुये फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातातील जखमी महिला वैशाली शिवाजी कोळी (वय 45, रा. नानीबाई चिखली, ता. कागल) यांचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
शुक्रवारी (दि. 5) दुपारी झालेल्या अपघातात त्यांचे पती शिवाजी कोळी यांचा जाग्यावरच मृत्यू झाला होता, तर वैशाली कोळी गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या, त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. रात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कागलमध्ये वास्तव्यास असणार्या शिवाजी कोळी आणि वैशाली कोळी या दोघाही पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मागे असणार्या तीन मुली आणि दोन मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत.
महामार्गावर अपघातात एक जखमी
कोल्हापूर : पुणे - बंगळूर महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) येथे झालेल्या रोड अपघातात संजय विठ्ठल मोहिते (वय 40, रा. कापशी, ता. शाहूवाडी) जखमी झाले. दि.12 नोव्हेंबरला अपघात झाला होता. जखमीवर पुणे व कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी जखमीला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.