इचलकरंजी : खेळताना चक्कर येऊन पडल्याने देविका प्रवीण बिरादार (वय 9, रा. पुजारी मळा) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास पुजारी मळा येथे घडली. याबाबतची वर्दी प्रशांत बाळू बिरादार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पो. नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली.
देविका ही इतर मुलांसमवेत घरासमोर रस्त्यावर खेळत होती. यावेळी तिला चक्कर आली. तातडीने तिला खासगी रुग्णालयात नेले. तर पुढील उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तिच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पो. हे. कॉ. उदय शिंदे करत आहेत.