kolhapur Crime news | चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime news | चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार

परप्रांतीय तरुणास अटक : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

उजळाईवाडी / कोल्हापूर : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी करण कुंवर (२५, रा. गोकुळ शिरगाव, मूळ आसाम) याला अटक केली. पीडितेच्या आईने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीत काम करणार्‍या करणसह परप्रांतीय कामगार आवारातच राहतात. याच परिसरात पीडितेचे कुटुंब राहते. दुपारी पीडितेस करणने चॉकलेटच्‍या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. भेदरलेल्या अवस्थेत ती घरी आली. आईसह तिच्या कुटुंबीयांनी ११२ हेल्पलाईन नंबरला घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी करणला ताब्यात घेतले. संशयित करण आणि पीडित कुटुंब हे मूळचे आसामचे आहे. त्‍याचे पीडिताच्‍या घरी येणे-जाणे होते. पीडिता त्‍याच्‍या अंगाखांद्यावर खेळल्‍याचे सांगण्या‍त आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT