कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई शनिवार (दि. 16) पासून दोन दिवस कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. शनिवारी दुपारी चार वाजता ते दिल्ली येथून राज्य शासनाच्या विशेष विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.
रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होईल. सीपीआरसमोरील सर्किट बेंचच्या इमारतीतील हा कार्यक्रम झाल्यानंतर ते मेरी वेदर मैदानावर होणार्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रात्री आठ वाजता कोल्हापूर विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होणार आहेत.