कुसरना गावात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 11 फुटी पुतळ्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा कौशल्य शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन शनिवारी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. 
कोल्हापूर

उत्तर प्रदेशातील कुसरना येथे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा कौशल्य केंद्र, अश्वारुढ पुतळ्याची पायाभरणी

खा. शाहू महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील कुसरना (जि. जौनपूर) गावात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 11 फुटी पुतळ्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा कौशल्य शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन शनिवारी खा. शाहू महाराज यांच्या हस्ते झाले.

तरुणांचा उत्कर्ष व्हावा, त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी म्हणून कुसरना गावातील आशा ज्योती रूरल उडान फाऊंडेशनच्या वतीने या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा 11 फूट उंच अश्वारुढ पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा या नावाने असणार्‍या कौशल्य प्रशिक्षण केंद्रात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक ग्रंथालय, अ‍ॅकॅडमीची उभारणी मूळचे कुसरना गावचे व सध्या इचलकरंजीत स्थायिक झालेल्या रवी उपाध्याय यांनी सुरू केली आहे.

खा. शाहू महाराज यांचे स्वागत ग्रामस्थांनी उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात व्हिन्टेज कारमधून मिरवणूक काढून केले. शिक्षण संस्थेतून घडणारे विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षक, यशस्वी व्यावसायिक व्हावेत अशी अपेक्षा खा. शाहू महाराज यांनी व्यक्त केली. फाऊंडेशनचे संस्थापक रवी उपाध्याय यांनी स्वागत केले. यावेळी प्रेमनाथ उपाध्याय, चंद्रकांत गांधी, महेश लढ्ढा, श्याम शर्मा, विनोद दुल्हाणी, हिरा यादव, रामसूरत यादव, प्रमोदसिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT