ChatGpt चा गैरवापर करुन तेऊरवाडी परिसरात वाघ आल्याची पसरवली अफवा : प्रत्‍यक्षात निघाला बिबट्या! 
कोल्हापूर

ChatGpt चा गैरवापर करुन तेऊरवाडी परिसरात वाघ आल्याची पसरवली अफवा : प्रत्‍यक्षात निघाला बिबट्या!

वाघाचा खोटा फोटो व्हायरल, कोवाड येथील तरुणाला वनविभागाने पाठवली नोटीस

पुढारी वृत्तसेवा

ChatGPT Misuse चंदगड : चंदगड तालुक्यात विविध वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी तेऊरवाडी गावाजवळ बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. बिबट्याचा वावर निश्चित असताना कोवाड येथील एका डॉक्टर महिलेच्या भावाने चॅट जीटीपी चा वापर करून तेऊरवाडी - हडलगे रस्त्यावर वाघ आल्याचा फोटो व्हायरल केला. याबद्दल वनखात्याने सदर तरुणाला नोटीस बजावली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गंधर्वगड (ता. चंदगड) परिसरातील जंगलातील एका बिबट्याने मागील पंधरवड्यापासून कोवाड परिसरातील हुंदळेवाडी, किणी, नागरदळे, मलतवाडी, म्हाळेवाडी, तेऊरवाडी या परिसरात वावर सुरू केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या शोधात हा बिबट्या अनेक गावांच्या वेशीत येत आहे. हाच बिबट्या तेऊरवाडी येथे दोन दिवसापूर्वी आला होता.

मात्र हडलगे येथील दवाखान्यातील काम संपवून कोवाड कडे परतणाऱ्या डॉक्टर महिला व त्यांच्या भावाने हा पटेरी वाघ पाहिल्याचा खोटा प्रचार केला. त्या डॉक्टर महिलेच्या भावाने चॅट जीटीपी चा वापर करून पट्टेरी वाघाचा फोटो तयार केला व हडलगे रस्त्यावर आल्याचा फोटो व्हायरल केला. ही बातमी काही प्रसारमाध्यमानी प्रसारित केली.

या घटनेची दैनिक पुढारी तर्फे सत्यता जाणून घेतली असता, सदर फोटो हा संबंधित तरुणाने चॅट जीटीपी या एआयचा वापर करून पट्टेरी वाघाचा फोटो व्हायरल केला असल्याची माहिती वन खात्याने दिली. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारे होसूर घाटात वाघ आल्याचा खोटा फोटो व्हायरल करून शेतकरी वर्गात मोठे भीतीच्या वातावरण निर्माण केले होते.

खोटा फोटो आणि वन खात्याची पळापळ

वाढतील डॉक्टर महिलेच्या भावाने खोटा फोटो व्हायरल केल्याने याची समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही वृत्तपत्रांनीही ही बातमी प्रसारित केली. त्यानंतर वन खात्याने घटनास्थळी ड्रोन पथक बोलावून वाघाचा माघ घेतला. यानंतर त्यांनी या फोटोची पुन्हा एकदा सत्यता जाणून घेतली. यानंतर हा फोटो खोटा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित तरुणावर आता दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

कोवाड येथील एका डॉक्टर महिलेच्या भावाने चाट जीटीपी चा वापर करून वाघाचा खोटा फोटो व्हायरल करून परिसरातील प्रवाशांना व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास दिला आहे. याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत. गंधर्वगड परिसरातील अनेक गावांच्या शिवारात मात्र बिबट्याचा वावर निश्चित आहे.
जॉन्सन डिसोजा, वनपाल, पाटणे वनपरिक्षेत्र.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT