चांदोली अभयारण्यात नॅचरलिस्ट प्रणव महाजन यांच्या कॅमेर्‍यात कैद झालेला ‘चेंजेबल हॉक ईगल’ पक्षी.  
कोल्हापूर

Changeable Hawk Eagle | चांदोलीच्या जंगलात राजेशाही दर्शन; ‘चेंजेबल हॉक ईगल’ कॅमेर्‍यात कैद!

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात अलीकडेच एका ‘राजेशाही’ पाहुण्याचे दर्शन झाले आहे. आपल्या शिस्तबद्ध शिकारीसाठी आणि मस्तकावरील वैशिष्ट्यपूर्ण तुर्‍यासाठी ओळखला जाणारा ‘चेंजेबल हॉक ईगल’ (बहिरी ससाणा) नुकताच पक्षीनिरीक्षक प्रणव महाजन यांच्या कॅमेर्‍यात टिपला गेला. या दर्शनामुळे चांदोलीचा वनपरिसर पक्षीमित्र आणि अभ्यासकांसाठी पर्वणी ठरला आहे.

या गरुडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याच्या मस्तकावर असलेला डौलदार तुरा, ज्यामुळे त्याला एक स्वतंत्र ओळख आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. इंग्रजीमध्ये याला ‘चेंजेबल हॉक ईगल’ असे संबोधले जाते. कारण, याच्या रंगात गडद तपकिरी ते फिकट छटांचे वैविध्य आढळते. हा पक्षी केवळ देखणाच नाही, तर अरण्यविश्वातील अत्यंत चपळ शिकारी आहे. उंच झाडावर बसून तीक्ष्ण नजरेने सावजाचा मागोवा घेणे आणि शक्तिशाली पंज्यांनी झडप घालणे ही याची खासियत. प्रामुख्याने ससे, साप आणि लहान प्राण्यांवर हा आपली उपजीविका करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT