kolhapur | चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून लढावे; सतेज पाटील यांची ताकद दाखवू Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून लढावे; सतेज पाटील यांची ताकद दाखवू

काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर; मग राजकारणातील खरा दादा कोण, ते ठरेल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडून कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून लढावे. त्यांच्या विरुद्ध आ. सतेज पाटील लढतील. आ. पाटील यांची ताकद आम्ही दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी शुक्रवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत दिला. त्यानंतर राजकारणातील खरा दादा आ. सतेज पाटील की मंत्री चंद्रकांत पाटील हे ठरेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे नगरसेवक म्हणाले, स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राद्वारे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य एका दिवसात उभा राहिलेले नाही. त्यासाठी त्यांना अनंत अडचणी आल्या. आ‍व्हाने पेलावी लागली. त्यातून मार्गक्रमण करत त्यांनी आताचे शैक्षणिक साम्राज्य उभारले.

त्यांच्याविषयी मंत्री पाटील यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो. तुमच्या विरोधातही आमच्याकडे माहिती आणि भरपूर पुरावे आहेत. मंत्री पाटील यांनी स्वतः कधी पीठाची गिरणही काढली नाही. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. यापुढे दडपशाही खपवून घेणार नाही. यावेळी ठाकरे सेनेच्या स्वीकृत नगरसेवकाने मंत्री पाटील यांच्या डोक्यात सत्तेचा माज गेल्याचा आरोप केला.

ईडी, सीबीआयला घाबरत नाही...

सतेज पाटील यांना उद्ध्व‌स्त करण्याची भाषा खपवून घेणार नाही, असे सांगून काँग्रेसचे नगरसेवक म्हणाले, सत्तेच्या आणि मंत्रिपदाच्या जोरावर चंद्रकांत पाटील धमक्या देत आहेत; पण आम्ही ईडी, सीबीआयसह कोणत्याही यंत्रणेला घाबरत नाही. गोकुळची सत्ता मिळत नसल्यानेच भाजप नेते सैरभैर झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT