Earthquake pudhari
कोल्हापूर

चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सोम्य धक्का

Kolhapur Earthquake News | भूकंपाची तीव्रता सौम्य असल्यामुळे धरणास कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. तर केंद्रबिंदू वारणावती पासून 17.6 किलोमीटर अंतरावर होता.

 बुधवारी (दि.29) दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी झालेला भूकंप शाहूवाडी तालुक्यातील चांदोली परिसरातील शित्तुर वारुण, शिराळे, मणदूर, उखळू या परिसरात जाणवला, अशी माहिती वारणावती भूकंप मापण केंद्रातून मिळाली. या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. तसेच या परिसरात कोणती हानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT