कोल्हापूर

चंदगड : भरधाव कारच्या धडकेत यशवंतनगर-कोनेवाडीच्या प्राध्यापकाचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

backup backup

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : पर्यटनासाठी जाणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या प्रा. सतीश सीताराम शिंदे ( सद्या रा. यशवंतनगर मूळ गाव कोनेवाडी ता. चंदगड ) यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांच्या पाठीमागे बसलेले पारस सुरेश निर्मळकर ( रा. कुदनूर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एका दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी फाट्या नजीक सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

चंदगड येथील रवळनाथ ज्युनिअर कॉलेजमध्ये शिंदे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. यशवंतनगरहून ते चंदगड च्या दिशेने आपल्या होंडा ( क्र. एम एच ०९- २४३४ ) वरून जात असतांना चंदगडहून बेळगावच्या दिशेने हुंडाई ओरा कार ( क्र. एम एच १४- के कुय ८२२० ) या जाणाऱ्या भरधाव कारची धडक बसली. तत्पुर्वी एका दुचाकीवरील दोघांना उडवले. त्या नंतर शिंदे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये शिंदे यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवल्या प्रकरणी स्वप्नील सुनिल चांदन (वय २३ रा. संत ज्ञानेश्वर नगर थेरगाव जि पूणे ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या संदर्भात चंदगड पोलिसात संजय अर्जुन शिंदे ( रा. कोनेवाडी ) यानी फिर्याद दिली असून आरोपी विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. नम्र, अत्यंत साधी राहणी , मनमिळावू असणारे प्रा. सतिश इंग्रजी विषयाचे अध्यापन करत होते.त्यांच्या आकस्मित मृत्यूने यशवंतनगर व कोनेवाडी गावांवर शोककळा पसरली. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला.आज दुपारी यशवंतनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, डॉक्टर भाऊ, पत्नी व ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT