कोल्हापूर

Chandgad Crime | पुतणीशी प्रेमविवाह केल्याने चुलत्याकडून भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार

पाटणे फाटा बाजारपेठेत थरार, दोन संशयितांचे पलायन

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : पुतणीबरोबर प्रेमविवाह केल्याचा जुना राग मनात धरून एका तरुणावर बेळगाव - वेंगुर्ला या राज्य मार्गावरील पाटणे फाटा ( ता. चंदगड ) येथील बाजारपेठेत भर दिवसा हल्ला करण्यात आला. या तरुणाचा चुलता व त्याच्या भाऊबंदकीतील एक साथीदार या दोघांनी कोयता व विळा या दोन हत्यारानी सपासप वार करत खुनी हल्ला केला. गजबजलेल्या बाजारपेठेतील चौकात सोमवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेत अजय दत्तू नाईक ( वय २८, मुळगाव - वरगाव, नाईकवाडा व सध्या बस स्थानकाच्या पाठीमागे, चंदगड) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत.

जखमी तरुण अजय याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय याची पत्नी निशा हिचे चुलते अशोक नाईक ( वय ४२, रा. वरगाव - नाईकवाडा) याच्या मनात अजय याने निशाशी प्रेम विवाह केल्याबद्दल राग होता. अजय व निशा यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. सोमवारी अजय हा पाटणे फाटा येथील शारदा मोबाईल शॉपीमध्ये गेला होता.

यावेळी अशोक व ज्ञानेश्वर दत्तू नाईक ( वय २४, रा. वरगाव - नाईक वाडा ) हे दोघेजण आपापल्या हातात कोयता व विळा घेऊन आले. गजबजलेल्या चौकात सपासप वार सुरू केले. या घटनेत अजय गंभीर जखमी झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय याने चार वर्षांपूर्वी निशा हिच्याबरोबर प्रेमविवाह केला आहे. या रागातूनच निशा हिचा चुलता अशोक यांने हा हल्ला केला आहे. या थरारामुळे संपूर्ण पाटणे फाटा परिसर सून्न झाला.

घटनास्थळावरून दोघेही संशयित आरोपीनी पलायन केले आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव‌ घेत दोन्ही विशेष पथकाद्वारे पलायन केलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. अजयच्या डोकीला व खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT