Accident News Pudhari
कोल्हापूर

Chandgad Accident : दुचाकी अपघातात माणगावचा एक जण ठार, एक जखमी!

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : वेंगुर्ला राज्य मार्गावरील हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून माणगाव येथे आपल्या गावी जात असताना मलगड फाटा येथे चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेला पडली.

कपाळाला तसेच तोंडाला मुका मार लागल्याने दुचाकीचालक शिवाजी महादेव ससेमारी (वय ४०, रा. माणगाव, ता. चंदगड) याचा जागीच मृत्यू झाला. तर या दुचाकीवर मागे बसलेला विलास शिवाजी घोळसे (वय ३९, व्यवसाय सोलर वॉटर हीटर एजन्सी चालक, रा. मलगड, ता. चंदगड ) हा किरकोळ जखमी झाला. चंदगड पोलीस ठाण्यात विलास घोळसे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

मृत शिवाजी व विलास हे दोघेजण शिवाजी यांच्या दुचाकीवरून पाटणे फाटा येथे जेवण करून घरी परतत होते. यादरम्यान मलगड फाटा येथे भरधाव दुचाकी स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला पडली. या दरम्यान त्याच्या डोकीला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चंदगड येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास कोवाड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक व्ही आर गेंगजे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT