प्रातिनिधीक छायाचित्र  
कोल्हापूर

Chandagad News : उमगाव पैकी माळीवाडी येथे शिवारात आढळला बेपत्ता वृद्धाचा सांगाडा

चंदगड तालुक्यातील घटना - पाच महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाचा असल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : उमगाव पैकी माळीवाडी (ता. चंदगड ) येथील एका बेपत्ता वृद्धाचा सांगाडा शेंडा टेक नावाच्या शेतात आढळला. हा सांगाडा पाच महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या धोंडीबा विठोबा सावंत (वय ७९, रा. उमगाव पैकी माळीवाडी, ता. चंदगड) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची वर्दी विक्रम विठोबा सावंत (वय ३१) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.

त्याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडीबा सावंत हे ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० पासून गायब होते. त्यांच्या सांगाडा गुरुवारी (दि. १४) माळीवाडी येथील शेंडा टेक नावाच्या शेतात आढळला. ते शेताकडे जातो म्हणून गेले होते, यानंतर ते बेपत्ता होते. याबाबत पाच महिन्यापूर्वीच बेपत्ता झाल्याची तक्रार मनोहर धोंडीबा सावंत यांनी चंदगड पोलिसात दिली होती. त्यानंतर मृत व्यक्तीच्या शरीराचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. बी. नाईक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT