कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच ‘गुढीपाडवा’. या मांगल्याच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी ‘तालचक्र’ आणि ‘पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने व पुनित बालन ग्रुप यांच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या समृद्ध परंपरेला समर्पित असा ‘चैत्रपालवी - तालचक्र’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांमध्ये सुरांच्या आणि तालांच्या साथीत कलेची गुढी उभारली जाणार आहे.
कोल्हापूर येथील सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्स हे ज्वेलरी पार्टनर आहेत. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन सत्रांमधून रसिकांना मिळणारा सांगीतिक आनंद. पहिल्या सत्रात ताल, स्वर आणि नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. यामध्ये पद्मश्री विजय घाटे यांचा जादूई तबला, कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचे नृत्य, गायक सुरंजन खांडाळकर यांचे गायन आणि हार्मोनियमवर यशवंत थिटे यांची साथ लाभणार आहे.
दुसर्या सत्रात ख्यातनाम गायिका विदुषी देवकी पंडित यांची मंत्रमुग्ध करणारी गायन मैफल रंगणार असून त्यांना तबला साथ प्रशांत पांडव आणि हार्मोनियम साथ अभिनय रावांडे यांची लाभणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम रसिकांना एक अविस्मरणीय आणि प्रसन्न अनुभव देणारा ठरेल.
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण
कोल्हापूर : 18 मार्च 2026, सायंकाळी 6 नंतर, डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल (कमला कॉलेज), राजारामपुरी.
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका : कोल्हापूरमध्ये टोमॅटो एफएम ऑफिस, वसंत प्लाझा, आयसीआयसीआय बँकेच्या वर, बागल चौक, कोल्हापूर येथे गुरुवार, दि. 12 पासून दुपारी 12 ते 5.30 या वेळेत प्रवेशिका संपेपर्यंत उपलब्ध राहतील.
अधिक माहितीसाठी संपर्क अमर : 9545327545,
विजय : 8149582442