Chaddi-Baniyan Gang | पेठवडगावात ‘चड्डी-बनियन गॅंग’चा मध्यरात्री थरार; दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न 
कोल्हापूर

Chaddi-Baniyan Gang | पेठवडगावात ‘चड्डी-बनियन गॅंग’चा मध्यरात्री थरार; दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

​पेठवडगाव : शहरात कुख्यात ‘चड्डी-बनियन गॅंग’ने मध्यरात्री धुमाकूळ घालत सलग दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा थरार घडला असून पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी नागरिकांवर दगडफेक करत अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मराठा समाज भवनाजवळ असलेल्या अनिल चव्हाण यांच्या घराला या टोळीने लक्ष्य केले. घरात चोरीचा डाव आखत असतानाच सुदैवाने घरमालक जागे झाले आणि समोर आले. हे लक्षात येताच चोरट्यांची तारांबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड सुरू करताच या टोळीने प्रतिकार करत जमलेल्या लोकांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली आणि परिसरात दहशत पसरवत तेथून पळ काढला. यानंतर अवघ्या काही वेळातच या टोळीने चांदोली वसाहतीकडे मोर्चा वळवला. येथील बी. जी. मोरे यांच्या मालकीच्या इमारतीमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एकाच रात्री पाठोपाठ दोन ठिकाणी चड्डी-बनियन गॅंगने घुसखोरी केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT