kolhapur Crime News | शिवसेना शिंदे गटाच्या शहर उपप्रमुखासह सहा जणांवर गुन्हा File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime News | शिवसेना शिंदे गटाच्या शहर उपप्रमुखासह सहा जणांवर गुन्हा

स्टेटसचा जाब विचारत दहशत माजविण्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विरोधात स्टेटस ठेवल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचा शहर उपप्रमुख कपिल केसरकरसह सहा जणांनी रविवार पेठेत दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फारुख बाबासाहेब खान (वय ३३) याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी सोनटक्के तालीम परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी महेश नलवडे (रा. उत्तरेश्वर पेठ), प्रभू गायकवाड (कळंबा), उदय भोसले (जुना बुधवार पेठ), बंडा लोंढे (कळंबा) व उमेश रेळेकर (बुरुड गल्ली, शनिवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फारुख खानने मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसचा राग मनात धरून कपिल केसरकरसह सहा जण त्याच्या रविवार पेठ येथील घराच्या परिसरात आले. त्यांनी फारुखला घराबाहेर बोलावत शिवीगाळ सुरू केली. परंतु, मोठ्या संख्येने केसरकरचे साथीदार दारात असल्याने फारुख बाहेर आला नाही. केसरकर याने त्याला उद्देशून ‘आमच्या साहेबांविरोधात स्टेटस लावलास, तुला सोडणार नाही,’ असे धमकावल्याने फारुख अधिकच घाबरला. त्याने पोलिसांना फोन करून मदत मागितली. पोलिस येण्याआधीच केसरकर आणि त्याचे साथीदारांनी पलायन केले. याप्रकरणी लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अंमलदार राजेश वरक अधिक तपास करीत आहेत.

जुना राजवाड्यातही गुन्हा दाखल

शुक्रवारी सायंकाळी गुजरीतील प्रदीप राठोड याच्यावर केसरकरसह जमावाने हल्ला केला. याप्रकरणी कपिल केसरकर, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथून हा जमाव थेट फारुख याच्या घरासमोर आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT