kolhapur | विमानतळावर चरस दिल्लीतूनच आले pudhari file photo
कोल्हापूर

kolhapur | विमानतळावर चरस दिल्लीतूनच आले

जिमट्रेनरच्या शोधासाठी पथक दिल्लीला जाणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे सापडलेले ७१ ग्रॅम चरस दिल्लीतून आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली येथील जिमट्रेनर आकाश सेहरावत (रा. पोचनपूर, द्वारका, दिल्ली) हा कोल्हापुरात येताना चरस सोबत घेऊन आल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण व गांधीनगर पोलिसांचे एक पथक आकाशचा शोध घेण्यासाठी लवकरच दिल्लीला जाणार आहे.

मयूर मानेच्या खोलीत राहण्यास

या प्रकरणातील संशयित मयूर माने याने सम्राटनगर परिसरात पैलवानांना राहण्यासाठी १० ते १२ खोल्या तयार केल्या आहेत. याच ठिकाणी आकाश राहण्यास होता. मयूर शहरातील एका माजी आमदाराचा जवळचा नातेवाईक आहे.

कारने आगमन, विमानाने पलायन

दिल्लीतून येताना आकाश मित्रासोबत कारमधून आला होता. मित्र आकाशला सोडून परत दिल्लीला रवाना झाला, तर आकाश कोल्हापुरातच थांबला होता. मात्र, कोल्हापुरात त्याचे मन लागत नसल्याने शनिवारी कोल्हापुरातून जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातून मुंबई आणि तेथून दिल्ली असा विमान प्रवास त्याने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT