Cafe Vandalism Case | कॅफेमधील साहित्याचे नुकसान, मारहाण : महिलेसह चौघांवर गुन्हा  File Photo
कोल्हापूर

Cafe Vandalism Case | कॅफेमधील साहित्याचे नुकसान, मारहाण : महिलेसह चौघांवर गुन्हा

शाहूपुरीत भरचौकातील घटना : संशयित पसार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीतील पार्श्वनाथ बँकेजवळील युनिकॉन कॅफेमधील साहित्याचे नुकसान करून मालक पूजा संभाजी पाटील (वय ३१, रा. हासूर, ता. करवीर) यांना शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी अंजली जाधव हिच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरूद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

पूजा पाटील यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. संशयित अंजली जाधवसह तीन अनोळखी व्यक्ती गुरुवारी सायंकाळी कॅफेमध्ये आले. बोलत असताना त्यांच्यात शिवीगाळ, भांडण सुरू झाले. पूजा पाटील यांनी संबंधितांना कॅफेमध्ये भांडणे करू नका, असे सांगितल्यानंतर अंजली जाधव हिने पाटील यांना शिवीगाळ करून पोटात, पाठीवर, तोंडावर ठोसे लगावले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर कॅफेबाहेर जाऊन अंजली जाधवसह तिघा अनोळखींनी पूजा पाटील यांना शिवीगाळ करून कॅफे बंद पाडण्याची धमकी दिली. वाद वाढत असतानाच पाटील कॅफेबाहेर आल्या असता, पुन्हा त्यांना मारहाण करून संशयितांनी कॅफेमधील साहित्याचे नुकसान केले. खुर्च्या भिरकावून टाकल्या. अंजली जाधवसह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना अद्याप अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT