सेनापती कापशी : जैन्याळपैकी माळवाडी (ता. कागल) येथे दोन बंगले फोडून 11 तोळे सोने व चांदीसह 55 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
माळवाडी येथे रामचंद्र ज्ञानू भोंगाळे यांचा बंगला आहे. ते पत्नीसह दहा दिवसांपासून आपल्या मुलाकडे पुणे येथे राहण्यासाठी गेले आहेत. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास बंगल्याच्या दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी 11 तोळे सोने, चांदीसह रोख रक्कम 40 हजार रुपये लंपास केले. बाजूलाच बाबुराव भोंगाळे यांचा बंगला आहे. ते सध्या निपाणी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरीही चोरट्यांनी तिजोरी उचकटून त्यातील 15 हजार रुपयांवर डल्ला मारला. मुरगूड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.