महेश तुरबतमठ Pudhari
कोल्हापूर

Gadhinglaj | गडहिंग्लज नगराध्यक्ष तुरबतमठ यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; जात दाखला अवैध ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांचा बेडाजंगम जातीचा दाखला जात पडताळणी कार्यालयाने अवैध ठरवला आहे. यानंतर त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात हरकत दाखल करत या निर्णयाला स्थगिती मागविली होती. याबाबत १३ जुलै रोजी यावर सुनावणी ठेवली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी वकील व तुरबतमठ यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन उच्च न्यायालयाने सदर अवैधतेला स्थगिती दिली आहे. तुरबतमठ यांच्या द़ृष्टीने हा एक दिलासा आहे. त्यांचा दाखला अवैध झाल्यानंतर त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष सलवादे यांच्याकडे सोपवला होता. आता या प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, यातील आणखी एक याचिकाकर्ते विनोद बिलावर यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले असून आम्ही चौथ्या क्रमांकावर असून, २२ जुलै रोजी या प्रकरणातील आमचे म्हणणे सादर करणार आहे. त्यामुळे अजूनही २२ जुलै रोजी यामध्ये पुढे काय होणार हे पाहावे लागणार आहे. तूर्तास राष्ट्रवादीसाठी ही स्थगिती फार महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT