कोल्हापूर

कोल्हापूर : ‘त्या’ बॉम्बस्फोटाच्या चाचण्यांबद्दल माहिती संकलन सुरू

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा तसेच कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस येताच कोल्हापूर पोलिसही खडबडून जागे झाले असून वरिष्ठ स्तरावरून याबाबतची सखोल माहिती घेतली जात आहे. 'इसिस'सारख्या दहशतवादी संघटनेशी येथे कोणाचे संबंध आहेत का? कोल्हापूरच्या नेमक्या कोणत्या जंगलात अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या, याबाबत पोलिसांनी आता माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडील पेन ड्राईव्हमधून उघड झालेली धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. अशा प्रकारची दहशतवादी कृत्ये घडत असल्याने पोलिस पुन्हा सतर्क झाले असून संशयितांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणांची आता सखोल चौकशी होणार आहे. हे दहशतवादी परराज्यांतील असल्याने त्यांना येथील जंगलांची माहिती कोणी दिली. ते कोणाच्या संपर्कात होते का, या सर्वांचा शोध घेण्याचे काम पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. कोणी स्थानिकांनी त्या दहशतवाद्यांना मदत केली आहे का, याचा शोध पोलिस घेणार आहेत. दहशतवाद्यांनी नेमकी या तीन जिल्ह्यांतील कोणत्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली. बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले, याचा उलगडा करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

SCROLL FOR NEXT