वारणानगर : येथील वारणा नदीवरील चिकुर्डे धरणावरून वाहून गेलेल्या आदित्य दीपक दाभोळकर (वय 22, रा. वारणानगर) या तरुणाचा मृतदेह दुसर्या दिवशी सायंकाळी निलेवाडी हद्दीत सापडला. रविवारी सकाळी आदित्य हा आईसोबत अंथरुण धुण्यासाठी गेला होता.
अंथरुण धुऊन झाल्यानंतर आईला घरी सोडून तो पुन्हा पोहण्यासाठी मित्रासोबत चिकुर्डे धरणाजवळ आला. पोहताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. सोमवारी दिवसभर रेस्क्यू टीमने निलेवाडीपर्यंत शोध घेतला. सहाच्या सुमारास चिकुर्डे पुलाच्या खालच्या बाजूला त्याचा मृतदेह सापडला. दोन तालुक्यांच्या हद्दीवर घटना घडल्याने दिवसभर वडगाव व कोडोली पोलिस उपस्थित होते.