Rajarshi Shahu Chhatrapati museum: राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचे आज लोकार्पण Pudhari
कोल्हापूर

Rajarshi Shahu Chhatrapati museum: राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचे आज लोकार्पण

दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयाच्या झालेल्या कामाची इंद्रजित सावंत यांनी दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : कसबा बावडा येथील ‌‘लक्ष्मी विलास पॅलेस‌’ या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग््राहालय उभारण्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आज (शनिवार) दुपारी 4 वा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या संग्रहालयाची माहिती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी माध्यम प्रतिनिधींना दिली. संग््राहालयामध्ये मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरील छायाचित्रांची सचित्र माहिती जागोजागी देण्यात आली आहे. याशिवाय शाहूकालीन वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग््राहालयामध्ये मांडण्यात आलेला शाहू महाराजांचा जीवनपट निश्चितच इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक झाली.

बैठकीस करवीचे तहसीलदार स्वप्निल पवार, वस्तुसंग््राहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, अक्षय कुरणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सी. एस. ओतारी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्राथमिक शिक्षण विभागाच्या रत्नप्रभा दवंडे, शाहू स्मारक व्यवस्थापक दत्तात्रय नागर, अतुल पवार, बबनराव रानगे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, तसेच शिव प्रबोधिनीचे विजय पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

लोकार्पण सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यानिमित्ताने समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने शनिवारी दुपारी 3 वा. दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‌‘शाहू समता ज्योत रॅली‌’चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT