कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम राबवत दातृत्वाचा जागर केला. आ. पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी लाखो वह्या संकलित झाल्या. त्या लवकरच गरजू विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या यशामुळे यावेळी आ. पाटील यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांत अधिकच उत्साह होता. शहरासह राधानगरी, करवीर, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, भुदरगड, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसरात समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. आ. पाटील यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांचे शुभाशीर्वाद घेतले. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, मेघराज काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, तेजस पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, पूजा पाटील, वृषाली पाटील, स्नेहा पाटील, देवश्री पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील यांनी आ. पाटील यांना शुभेच्छा देत वाढदिवस उत्साहात साजरा केला.
‘यशवंत निवास’समोर उभारलेल्या भव्य मंडपात दुपारी 3 वाजल्यापासून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, अखिल भारतीय काँग्रेसचे बी. संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, खासदार रवींद्र चव्हाण, गणेश हुक्केरी, माजी खासदार रजनीताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, राजेश पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, नसीम खान, सुमित कदम, निवेदिता माने, वीरकुमार पाटील यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
खासदार शाहू महाराज, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे निरीक्षक जयशंकर पाठक, माजी आमदार के. पी. पाटील, सत्यजित पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिणचेकर, शिवसेना उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, अण्णासाहेब चकोते, केडीसीचे संचालक भैया माने, युवराज बापू पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील, बाबासो चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, बयाजी शेळके, अमर पाटील, किसन चौगले, चेतन नरके, नंदकुमार ढेगे, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील व सदस्य, गगनबावडा पंचायत समिती सभापती छाया देसाई, राधानगरीचे सभापती आर. वाय. पाटील, दौलत देसाई, उदय नारकर, अभिजित तायशेटे, राहुल देसाई, राजू दिर्डोले, मानसिंग बोंद्रे, उदयानी साळुंखे, डॉ. के. एन. पाटील, विशाल देवकुळे, शशिकांत खोत, मंजित माने यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध नगरपालिकेचे नगरसेवक विविध गावचे सरपंच, काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, विविध तरुण मंडळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सामाजिक उपक्रम अन् गर्दीचा महापूर
आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘देऊया गरजूना साथ, वाढदिनी मदतीचा हात’ हा उपक्रम, नगरसेविका स्वालिया बागवान यांच्या वतीने कलिंगड वाटप, रामकृष्ण जाधव यांच्या वतीने कसबा बावडा येथे रक्तदान शिबिर झाले. शिवाय वह्या संकलन यंदाही विक्रमी झाले. यासह विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, फुटबॉल, क्रिकेट, बैलगाडी स्पर्धा आदींचे आयोजन केले होते. शिवाय शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमुळे अक्षरशः गर्दीचा महापूर उसळला होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.