kolhapur | बिद्री गर्भलिंग निदान : आणखी तिघांना अटक 
कोल्हापूर

kolhapur | बिद्री गर्भलिंग निदान : आणखी तिघांना अटक

आजअखेर 13 जणांवर गुन्हा; दोन संशयित फरारच

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. सुशांत नानासाहेब पाटील (वय 39, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), शुभम संजय पाटील (वय 25, रा. फराकटेवाडी, ता. कागल) व विठ्ठल तुळजाराम पाटील ( वय 42, रा. बिद्री, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. अटकेत असलेल्या आरोपींची संख्या अकरावर पोहोचली असून, 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सर्वांना दि. 30 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

ज्यांच्या नावावर या हॉस्पिटलचा परवाना आहे ते डॉ. उत्तमराव सरदेसाई व अक्काताई कांबळे अद्याप फरार आहेत. या प्रकरणात आरोपींवर गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. काही संशयित अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणाचा तपास मुरगूडच्या सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT