कोल्हापूर

स्वीकृत संचालकांची निवड! अमर पाटील आणि बळी पाटील यांची नावे निश्चित!

Bhogawati Sakhar Karkhana | सत्तारूढ आघाडीतील नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कार्यक्षेत्रात सभासदांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

आशिष पाटील

गुडाळ : भोगावती साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर जवळपास गेले अडीच वर्षे स्वीकृत तज्ञ संचालकांच्या निवडी रखडल्या आहेत. दरम्यान आज सोमवारी (दि.4) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी होणार आहेत.

दरम्यान, याच बैठकीत शासन नियुक्त संचालक म्हणून शिफारस करण्यात आलेले आरे (ता. करवीर) येथील संतोष पोर्लेकर यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात येणार आहे. भोगावती साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबर 2023 मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत स्वर्गीय पी एन पाटील, माजी आमदार संपतराव पाटील, ए वाय पाटील, अरुणकुमार डोंगळे, वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 25 पैकी 24 जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. तर विरोधी आघाडीचे धैर्यशील पाटील ( कौलवकर ) हे एकमेव विजयी झाले होते.

माजी आमदार पी एन पाटील यांचे झालेले आकस्मित निधन आणि त्यानंतर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकामुळे स्वीकृत संचालक निवडी रखडल्या होत्या. तथापी भोगावती आर्थिक महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत असताना पुन्हा स्वीकृत संचालकांच्या निवडीची गरज काय असा सवाल कार्यक्षेत्रात उपस्थित होत आहे. केवळ कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्यासाठी सत्तारूढ आघाडीतील नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कार्यक्षेत्रात सभासदांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

स्वीकृत संचालकांच्या दोन जागा पैकी एक जागेवर राहुल पाटील समर्थक माजी संचालक बळी तातोबा पाटील यांची तर दुसऱ्या जागेवर ए वाय पाटील समर्थक माजी संचालक अमर पाटील (आवळीकर) यांची निवड निश्चित झाली आहे. भोगावतीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता कारखान्याच्या प्रधान कार्यालयात होणाऱ्या बैठकीत या निवडी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT