कोल्हापूर : राष्ट्रीयाकृत, सहकारी बँका मंगळवारी महावीर जयंती असल्याने तसेच बुधवारी वर्ष अखेरचे कामकाज होणार असल्याने (मार्च एंडिंग) सलग दोन दिवस बंद राहणार आहेत.
बँकांसाठी मार्च महिना महत्त्वाचा असतो. या महिन्यांत वसुलीवर भर दिला जातो. रिझर्व्ह बँकेच्या कडक नियमावलीमुळे एनपीए शून्य टक्के राहण्यासाठी या महिन्यांत सर्वच शाखेत धावपळ सुरू असते. मंगळवारी महावीर जयंतीची बँकांना सुट्टी आहे. सरकारी विभागाच्या वसुली होण्यासाठी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी आरटीजीएस, क्लिअरिंग सुरू राहणार आहे. इतर व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांना कॅश वसुलीसाठी सोमवार, दि. 30 अंतिम दिवस होता. यामुळे वसुलीसाठी कर्मचारी दिवसभर फिल्डवर होते.