​​Fraud Case | कमिशनच्या आमिषाने बँक खात्यांचा वापर; 32 लाखांचा सायबर फ्रॉड दहाजणांवर  Pudhari File Photo
कोल्हापूर

​​Fraud Case | कमिशनच्या आमिषाने बँक खात्यांचा वापर; 32 लाखांचा सायबर फ्रॉड

दहाजणांवर गुन्हा; दोघांना अटक : सायबर शाखेकडून तपास

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कमिशनच्या आमिषाने गरीब व सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती वापरून तब्बल 32 लाख रुपयांचा सायबर फ्रॉड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता सायबर पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, तपास गतिमान केला आहे.

सायबर पोलिस दलाचे पोलिस कॉन्स्टेबल रोहित रवींद्र शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी तुमच्या बँक खात्याचा वापर करायचा आहे. त्याबदल्यात दरमहा पाच ते दहा हजार रुपये कमिशन देण्यात येईल, असे आमिष दाखवून संशयितांनी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची विविध बँकांमध्ये खाती उघडून घेतली.

याप्रकरणी सागर धनाजी भंडारी (वय 30, रा. विटा), अनिकेत धोंडिराम कुंभार (23, रा. शिंगणापूर), प्रथमेश पंडित मिरजकर (23, रा. बालिंगा), दर्शन रघुनाथ बचाटे (22, रा. बहिरेश्वर), मयुरेश विकास कांबळे (आझाद गल्ली, कोल्हापूर), श्रीदत्त विनोद कांबळे, सिद्धेश हरिदास मुसळे, साहिल खंडू शेख, तन्सूक सियाक आणि महेंद्र मेघवाल यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारी व कुंभार यांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT