महाराष्ट्रातील तसेत कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापुर येथील सदगुरु श्री बाळूमामा यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहास शनिवारी(दि.17) पासून प्रारंभ झाला. देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते समाधी पजन, अभिषेक, विना पूजनाने पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ झाला. सदरचा महासप्ताह शुक्रवार (दि.23) अखेर संपन्न होणार आहे. बाळूमामाच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळूमामांची समाधी मंदिराचे प्रवेशद्वार आणि मूर्ती विविध प्रकारच्या फुलांनी सजवण्यात आलेली आहे . खाऊची पाने झेंडूची फुले जरबेराची फुले सजावटीसाठी वापरण्यात आलेले आहेत.
शनिवारी (दि.17) सकाळी 7 वाजता अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते विना पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ,श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, संगीत भजन, हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील नामवंत विद्वत्तजनांची प्रवचन, कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन ह .भ. प भाऊसाहेब पाटील सकीनहासुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.