Balumama Temple | बाळूमामांचे व्हीआयपी दर्शन बंद; आदमापूर देवालय ट्रस्टचा निर्णय Pudhari File Photo
कोल्हापूर

Balumama Temple | बाळूमामांचे व्हीआयपी दर्शन बंद; आदमापूर देवालय ट्रस्टचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवालय ट्रस्टने ‘व्हीआयपी’ दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाळूमामांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी गाभारा आणि त्यासमोरील विशेष दर्शन व्यवस्था आता बंद करण्यात आली असून, सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे.

यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन, मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घ्यावे लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणार्‍या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून, दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व श्रीफळ, प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था आहे. सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजेभोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT