मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
मेघालयाचे राज्यपाल सी.एच.विजय शंकर हे आदमापूर ता.भुदरगड येथील बाळूमामा दर्शनासाठी येणार आहेत. यामुळे रविवार दि.15 सप्टेबर रोजी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.
मेघालयाचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर हे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सात वाजता कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथून महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे त्यांचे प्रस्थान करतील. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील दर्शनानंतर ते 8.25 ते 8:30 वाजता आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या दर्शनासाठी प्रस्थान होईल.
9:15 वाजण्याच्या दरम्यान ते बाळूमामा समाधीचे दर्शन घेऊन ते 9.40 नंतर पुढील दौऱ्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या दिशेने त्यांचे प्रस्थान करतील. असा त्यांचा रविवारचा दौरा निश्चित आहे. त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. याची नोंद घेऊन भाविक भक्तांनी सहकार्य करावे अशी विनंती बाळूमामा देवालय समितीच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके यांनी केली आहे.