कोल्हापूर

बाळूमामा देवस्थान : ट्रस्ट एकच, मग बैठका दोन कशासाठी?

दिनेश चोरगे

मुदाळ तिट्टा; प्रा. शाम पाटील : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालयाचा कारभार पाहण्यासाठी 2002 मध्ये गावाच्या पुढाकाराने एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टमार्फत आजपर्यंत मंदिराचा कारभार पाहिला गेला. महाराष्ट्र, कर्नाटकातील बाळूमामाचा सहवास असणार्‍या लोकांना गावाने ट्रस्टवर नियुक्त केले. बाळूमामा ट्रस्टच्या संपूर्ण कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मग, ट्रस्ट एकच असतानाना बैठका दोन कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवस्थान समितीमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण घुसू नये, अशी भावना आदमापूरवासीयांची आहे.

बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांचे महिन्यापूर्वी निधन झाले. या निधनापूर्वी बाळूमामा देवस्थानचा कारभार कार्याध्यक्ष म्हणून धैर्यशील भोसले यांनी सांभाळावा अशा पद्धतीचा विचार मांडून 3 फेब—ुवारी रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व उपस्थित ट्रस्टींच्या समोर भोसले यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. याच्या अगोदर पंढरपूर येथे बाळूमामाच्या मठात गावकरी व ट्रस्टी यांच्यामध्ये बैठक झाली. त्यात आदमापूर गावातील ट्रस्टी नेमण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी बाळूमामा चा भंडारा लावून आणाभाका घेण्यात आल्या. यावेळी सर्व ट्रस्टी व आदमापूर ग्रामस्थ उपस्थित होते. आपण दिलेला शब्द प्रमाण राहावा आणि गावाचा समावेश या ट्रस्टमध्ये करावा या उदात्त हेतूने 18 जानेवारी रोजी मासिक बैठक झाली. त्यामध्ये गावातील पाच जणांची या समितीवर निवड करण्यात आली. त्यावेळी जे ट्रस्टी हजर होते त्यांनी रितसर सह्या करून यांना घेण्यावर सहमती दर्शवली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रामभाऊ मगदूम यांचे निधन झाले. त्यानंतर या ट्रस्टीने ग्रामस्थांवर अविश्वास दाखवण्याचे काम पुन्हा सुरू केले.

सचिव रावसाहेब कोणकिरी यांनी 4 एप्रिल रोजी अचानक ट्रस्टच बैठक बोलवली; पण प्रोसिडिंगवरील सर्वच ट्रस्टीना त्याची पत्रे पाठवली नाहीत. फक्त बारा जणांना पत्रे देण्यात आली, असे समजते. उर्वरित लोकांना का डाववले, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. नूतन कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी 7 एप्रिल रोजी ट्रस्टची बैठक बोलवली आहे. या बैठकीची नोटीस सर्वच ट्रस्टींना दिली आहे, असे समजते.

SCROLL FOR NEXT