पुढारी ऑनलाईन डेस्क : वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा अमानुष खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे वूडकटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिले. खुनात कुरुंदकरने कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. शनिवारी न्यायालयात या तिघांवरील आरोप सिद्ध झाले. तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून...