कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ‌‘लक्ष्मी विलास पॅलेस‌’ या जन्मस्थळी साकारलेल्या संग््राहालयाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. यावेळी उपस्थित महापौर रूपाराणी निकम, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, कादर मलबारी आदी. (छाया : पप्पू अत्तार) 
कोल्हापूर

Ashish Shelar| राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ समतेचे प्रतीक : मंत्री शेलार

शाहूंच्या जीवनकार्यावरील संग््राहालयाचे शानदार लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग््राहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केले. या संग््राहालयाचे शनिवारी त्यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. या संग््राहालयासह कोल्हापूर शहर ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करत युगपुरुष छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शेलार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. जगात ज्याला मानवतावादी दृष्टिकोन व समतेच्या प्रयत्नातून आपल्या लोकांची सेवा करणारा राजा बघायचे असेल, त्यांनी शाहूंच्या जन्मस्थळी यावे लागेल. हे संग््राहालय आणि वास्तू म्हणजे सामाजिक न्याय आणि समता तसेच शिक्षणाला संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या अशा विभूतीचे आहे, ज्यांचे कार्य एका संग््राहालयात अथवा एका वास्तूत सामावूच शकत नाही. राज्य सरकारने या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे, असे सांगत शेलार यांनी या स्मारकासाठी दोन टप्प्यांत निधी दिला. स्मारकाच्या रिकाम्या जागेत तिसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र बनावे इतका मोठा इतिहास व ताकद या भागामध्ये आहे. यामुळे हे संग््राहालय, लक्ष्मी विलास पॅलेस तसेच कोल्हापूर शहर इतिहास पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विदेशात असलेली जगदंबा तलवार लीजवर भारतात आणावी, अशी अपेक्षा माजी खासदार संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. यावर उत्तर देताना ती तलवार आणण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ‌‘भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश‌’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस जतन व नियमायक समिती अंतर्गत असणाऱ्या वस्तुसंग््राहालय उपसमितीतील सदस्यांचा शेलार यांच्या हस्ते ग््रांथ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व शाहू गौरव गीताने करण्यात आली. राजर्षी शाहू सलोखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान काढलेल्या ‌‘शाहू समता ज्योत‌’ रॅलीचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार मालोजीराजे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, डॉ. वसंतराव मोरे, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. मंजुश्री पवार, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, उपसंचालक हेमंत दळवी, सहसंचालक डॉ. विलास वाहने, वास्तू संग््राहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे, समन्वयक उत्तम कांबळे, अमृत पाटील, वास्तुरचनाकार अर्चना देशमुख, विनय पाटील, चंदुलाल ओसवाल, किरणसिंह चव्हाण यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT