सीएटल येथे पालखी वाहताना सौरभ आणि ऐश्वर्या चौगले व आषाढी निमित्त दिंडी सोहळ्यात तल्लीन झालेली अमेरिकेतील मऱ्हाटमोळी मंडळी  
कोल्हापूर

Ashadhi wari in America | सातासमुद्रापार घुमला विठूनामाचा गजर : अमेरिकेतील सिएटल येथे आषाढी दिंडी सोहळा!

500 हुन अधिक महाराष्ट्रीय भाविक सहभागी, विठ्ठल नामात भाविक तल्लीन

पुढारी वृत्तसेवा

आशिष पाटील

गुडाळ: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनी 13 व्या शतकात आता विश्वात्मक देवें... असे म्हणून पसायदान लिहिले व त्यातून विश्वात्मक विचार देखील मांडला.! आज वारी सोहळ्याच्या निमित्ताने हाच वारकरी विचार जगभर पोहोचत आहे. अशावेळी अमेरिकेतील सिएटल शहरात देखील 500 हुन अधिक महाराष्ट्रीयन विठ्ठलभक्तांनी आषाढी एकादशी तिथे साता समुद्रापार दिंडी सोहळा काढून साजरी केली. तिथे विठ्ठल नामाच्या गजरात हे भाविक तल्लीन झाले होते.

सिएटल येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी गेलेल्या मराठमोळ्या मंडळींचे संत श्री. गजानन महाराज सांस्कृतिक मंडळ आहे. इतक्या दूर राहून देखील आपले सण, ऊत्सव साजरे करून आपली परंपरा जपताहेत. त्यानुसार ते आषाढी एकादशी दरवर्षी साजरी करतात.

सियेटल येथील एका सार्वजनिक हॉल मध्ये हा दिंडी सोहळा घेण्यात आला. त्यासाठी पालखी देखील सजवण्यात आली होती. ज्ञानोबा -तुकाराम असा गजर तसेच भजन देखील अगदी तालासुरात या मंडळींनी सादर केले. यावेळी ढोल-ताशा पथक तसेच नृत्य, फुगडी देखील घालण्यात आली. शेवटी पांडुरंगाची आरती व महाप्रसाद आयोजित केला होता. हा सर्व सोहळा तेथील अमेरिकन नागरिक देखील कुतूहलाने पाहत होते अशी माहिती राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द चे सुपुत्र सौरभ धनाजीराव चौगले यांनी दै. पुढारी प्रतिनिधीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT