कोल्‍हापूर : भारतीय जनता पक्ष ‘गोकुळ’ ठरावधारकांच्‍या मेळाव्‍यातील उपस्‍थितीनंतर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण नरके यांनी एकाच वाहनातून जाणे पसंत केले.  (छाया : पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Gokul Election | सतेज पाटलांसोबत असलेले अरुण नरके महादेवराव महाडिकांसोबत

महाडिक-नरकेंचा एकत्र प्रवास; पुन्हा सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : एकेकाळी ‘गोकुळ’ दूध संघावर अधिराज्‍य गाजवलेले माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी चेअरमन अरुण नरके हे ‘गोकुळ’च्‍या राजकारणात पुन्‍हा सक्रिय झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्‍या ‘गोकुळ’ ठरावधारकांच्‍या मेळाव्‍यात महाडिक यांच्या गाडीतून नरके आले. गतवेळी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असलेले नरके महायुतीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा दूध उत्‍पादक संघा (गोकुळ) च्‍या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकेकाळी महादेवराव महाडिक, स्‍वर्गीय पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांच्‍या ‘मनपा’ आघाडीची एकहाती सत्ता होती. या सत्तेला सुरुंग लावत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाच वर्षांपूर्वी सत्तांतर केले. सध्‍या ‘गोकुळ’ची निवडणूक लागली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगत आहे. ठराव जमा करण्‍यावरून दोन्‍ही आघाड्यांत रस्‍सीखेच सुरू आहे. महायुतीत पक्षपातळीवर ठराव जमा करण्‍यात येत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्‍या ठरावधारकांच्‍या मेळाव्‍यात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अरुण नरके यांनी हजेरी लावली. त्‍यांच्‍या उपस्‍थितीने ‘गोकुळ’च्‍या राजकारणात अधिक रंगत आली असून महायुतीची ताकद वाढल्‍याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी दाखल केले १०१ ठराव

कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवार, दि. २९ रोजी १०१ ठराव दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी राष्ट्रवादीची ठराव संख्या १,९८२ होणारच, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी उर्वरित १३८ ठराव बुधवार, दि. १ पर्यंत दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर १,९८२ ठरावांची पूर्तता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT