राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्र-शिल्प प्रदर्शन Pudhari News Network
कोल्हापूर

Shahu Maharaj Jayanti : लोकराजा प्रदर्शनास प्रारंभ

कलानगरीतील 26 कलाकारांकडून अनोखी मानवंदना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कलाप्रेमी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील चित्रकार व शिल्पकार यांच्या वतीने लोकराजा चित्र-शिल्प प्रदर्शनाचे आयोजन दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात करण्यात आले आहे.

बुधवारी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कलेचा उद्धारक आणि आश्रयदाता असणार्‍या लोकराजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील लहानथोर अशा 26 कलाकारांनी एकत्र येऊन ही अनोखी मानवंदना दिली आहे. राजर्षी शाहूंच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन आहे.

प्रदर्शनात विलास बकरे, अजेय दळवी, विजय टिपुगडे, प्रशांत जाधव, शिवाजी मस्के, अरुण सुतार, राहुल रेपे, मनोज दरेकर, मंगेश शिंदे, बबन माने, नागेश हंकारे, संतोष पोवार, सुनील पंडित, मनीपद्म हर्षवर्धन, गजेंद्र वाघमारे, विवेक कवाळे, विजय उपाध्ये, शैलेश राऊत, सर्वेश देवरुखकर, देवयानी देवरुखकर, योगेश मोरे, अभिजीत गडकरी, ओंकार कोळेकर, पुष्पक पांढरबळे, रमजान मुल्ला, आशिष सातपुते, प्रतीक्षा व्हणबट्टे या कलाकारांच्या कलाकृती आहेत. प्रदर्शन दि. 26 जून ते 28 जून या कालावधीत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहाणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT