file photo 
कोल्हापूर

कळंबा जेलमध्ये आणखी 21 मोबाईल

Arun Patil

[author title="दिलीप भिसे" image="http://"][/author]

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील तत्कालीन अधीक्षकांच्या कारकिर्दीत झालेला पोरखेळ शोधमोहिमेत चव्हाट्यावर येत आहे. अधीक्षक विवेक झेंडे यांनी पदभार स्वीकारताच काही तासांत 30 मोबाईलचा छडा लावला. त्यानंतर चार-पाच दिवसांत आणखी 21 मोबाईलसह चार्जिंग बॅटर्‍यांचे किट, सिमकार्डचे घबाड हाती लागलेे. गेल्या 50 दिवसांत 161 मोबाईल हस्तगत केले असून, 145 बॅटर्‍या, 18 सिमकार्ड, 88 चार्जिंग केबलही जप्त केल्या आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कळंबा जेलची सुरक्षा पोखरली आहे.

कळंबा कारागृहात अतिउच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या अंडासेलमध्ये देश- विदेशातील धोकादायक कैद्यांना बंदिस्त केले जाते. रात्रंदिवस सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असलेल्या अंडासेलमध्येही पंधरवड्यात मोबाईल आढळून आला.

ही बाब प्रशासनाच्या द़ृष्टीने निश्चित खतरनाक आहे. अंडासेलमध्ये मोबाईल पोहोचला कसा, हा कळीचा मुद्दा आहे. या धोकादायक बाबीचा भांडाफोड होण्याची गरज आहे.

अनेक गैरकृत्यांचा भांडाफोड

तत्कालीन अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याकडे दि. 30 मार्च, 2024 ते 29 एप्रिल, 2024 या 30 दिवसांच्या काळात अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. या काळात शेडगे यांनी कळंबा कारागृहातील बिघडलेल्या व्यवस्थापनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत अनेक गैरकृत्यांचा भांडाफोड केला आहे. कैद्यांवर करडी नजर ठेवत सातही बरॅकमध्ये शोधमोहीम राबविली. त्यात 111 मोबाईल, 22 चार्जिंग किट, 13 सिमकार्ड, 48 चार्जिंग केबल, 6 पेनड्राईव्ह, 10 वायर्स, 7 डोंगल राऊटर, 3 यूएसबी पोर्ट हस्तगत केले.

अंडासेलमधील दोन कैद्यांना नागपूर, अमरावतीला हलविले!

अंडासेलमध्ये बंदिस्त असलेल्या आणि संशयास्पद वर्तनामुळे 'टार्गेट'वर असलेल्या मोकाअंतर्गत कारवाई झालेल्या सातारा जिल्ह्यातील दोन कुख्यात कैद्यांना नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहांत हलविण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी सहा ते सात कैद्यांना अन्यत्र हलविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

संशयास्पद वस्तूंचा ढीगभर साठा हस्तगत

श्यामकांत शेडगे यांच्या बदलीनंतर विवेक झेंडे यांच्याकडे कळंबा कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. दि. 30 एप्रिल ते 20 मे या काळात त्यांनी अवघ्या 19 दिवसांत केलेल्या साफसफाई मोहिमेत 51 मोबाईल, 17 बॅटर्‍या, 4 चार्जिंग किट, 5 सिमकार्ड,4 चार्जिंग किट, 40 चार्जिंग केबल, 13 पेनड्राईव्ह, 7 वायर्स (ऑक्स केबल), 1 डोंगल राऊटर असा संशयास्पद वस्तूंचा साठा हस्तगत केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT