Dr. Jayasingrao Pawar first book | असे प्रकाशित झाले होते डॉ. पवार यांचे पहिले पुस्तक 
कोल्हापूर

Dr. Jayasingrao Pawar first book | असे प्रकाशित झाले होते डॉ. पवार यांचे पहिले पुस्तक

प्रकाशक अनिल मेहता यांनी सांगितली खास आठवण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी संशोधनाच्या माध्यमातून आजवर इतिहास विषयांवरील असंख्य पुस्तके लिहिली. इतिहासकार अशी ओळख कमावलेल्या डॉ. पवार यांच्या नावावर प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक विज्ञानविषयक होते हे मात्र फारसे कुणाला माहिती नाही. 1970 मध्ये डॉ. पवार यांचे पहिले पुस्तक कसे प्रकाशित झाले याची एक दुर्मीळ आठवण सांगत ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी डॉ. पवार आणि मेहता प्रकाशन यांच्यातील वीण द़ृढ केली.

मेहता म्हणाले, शिक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ. पवार विज्ञानकथा रंजकपणे शिकवायचे. त्यावेळी डॉ. पवार यांची प्रा. कांतीभाई ठक्कर, ल. रा. नसिराबादकर यांची घनिष्ठ मैत्री होती. ठक्कर यांनी डॉ. पवार यांना विज्ञानविषयक पुस्तक लिहिण्यासाठी सुचवले; पण डॉ. पवार यांनी प्रश्न केला की पुस्तक छापणार कोण? ठक्कर यांनी डॉ. पवार आणि माझी भेट घडवली आणि त्यानंतर ‘पदवीपूर्व जीवनाभिमुख विज्ञान’ हे पुस्तक मेहता प्रकाशनने प्रकाशित केले. पुढे ‘जीवन आणि विज्ञान’ नावाने ते बाजारात आणले आणि त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. पवार यांचे ‘पंचगंगेच्या तीरावरून’ आत्मचरित्र प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे. डॉ. पवार यांच्या आयुष्यातील अखेरचे पुस्तकही मेहता प्रकाशन प्रकाशित करणार आहे. पहिल्या ते अखेरच्या पुस्तकापर्यंतची ही साथ अविस्मरणीय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT