Amit Shah Kolhapur Visits | गृहमंत्री अमित शहा यांचे आज भरगच्च कार्यक्रम 
कोल्हापूर

Amit Shah Kolhapur Visits | गृहमंत्री अमित शहा यांचे आज भरगच्च कार्यक्रम

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापूर आणि इचलकरंजीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवीन प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे आयोजित कृतज्ञता सोहळा आणि धन्यवाद सभेला ते उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान शहा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाशीही चर्चा करणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. यानंतर केएटीपी मैदानावर आयोजित जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.

इचलकरंजी येथे राज्यातील साखर कारखानदारीतील विविध समस्यांबाबत कारखानदारांच्या शिष्टमंडळासमवेत ते चर्चा करणार आहेत. यासह बँकिंग फेडरेशनच्या शिष्टमंडळाशीही ते चर्चा करणार आहेत. इचलकरंजीहून सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून सायंकाळी सात वाजता ते मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईहून रात्री उशिरा ते दिल्लीला रवाना होणार आहेत. दिवसभराच्या दौऱ्यात सकाळी नऊ ते दहा, दुपारी दोन ते तीन या वेळेत महायुतीच्या नेत्यांशी विविध विषयांवर अमित शहा चर्चा करणार आहेत.

हे आहेत कार्यक्रम

सकाळी १० ते १२ : अंबाबाई मंदिर प्रदक्षिणा मार्ग, मंदिर संवर्धन शुभारंभ.

दुपारी १२.३० ते २ : कृतज्ञता सोहळा आणि धन्यवाद सभा.

दुपारी ४ : ‘कल्लाप्पाणा आवाडे सहकारी बँक’ प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन.

दुपारी ४.३० : ‘जवाहर साखर कारखाना’ नामविस्तार सोहळा व शेतकरी मेळावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT