कोल्हापूर

kolhapur | ‘गोल्डन अवर’चा खेळ गर्भवतीच्या जीवावर

रुग्णवाहिकेसह मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रसूतीची वाट बिकट; वर्षात जिल्ह्यात 63 मातामृत्यू

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : प्रसूतीची वेळ जवळ आल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, शहरात येण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव, यामुळे गर्भवती महिलांच्या प्रसूतीची वाट बिकट बनली आहे. प्रसूतीकळांपासून ते प्रसूतीपर्यंत गरजेचा असलेला ‘गोल्डन अवर’ न मिळाल्याने विलंबाचा हा खेळ अनेक गर्भवतींच्या जीवावर बेतत आहे. परिणामी, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये 63 मातामृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काही भागांत रुग्णवाहिका वेळेत न पोहोचणे किंवा रुग्णालयात पोहोचण्यात होणारा विलंब हा ‘हाय-रिस्क प्रेग्नन्सी’मधील मोठा धोका ठरत असल्याचे वास्तव आहे. प्रसूतीदरम्यान अचानक उद्भवणार्‍या गुंतागुंतीत काही मिनिटांचा उशीरही आई आणि बाळासाठी जीवघेणा ठरत आहे. अनेक गावांमध्ये तातडीच्या वेळी 108 रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी लागणार्‍या वेळेसह प्राथमिक आरोग्य केंद्रांतील त्रोटक साधने व असुविधांमुळेही गर्भवतींचा गोल्डर अवर हातातून निसटून जातो. परिणामी, ‘हाय-रिस्क’ गटातील गर्भवती महिलांना वेळेत उपचार मिळत नाहीत.

गोल्डन अवरका महत्त्वाचा?

प्रसूतीदरम्यान अचानक गुंतागुंत होण्याची शक्यता

जास्त रक्तस्त्राव झाल्यास तत्काळ उपचार गरजेचे

काही मिनिटांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT