Ambabai Temple | अंबाबाई मंदिर आजपासून मंगळवारपर्यंत दर्शनासाठी बंद File Photo
कोल्हापूर

Ambabai Temple | अंबाबाई मंदिर आजपासून मंगळवारपर्यंत दर्शनासाठी बंद

उत्सवमूर्ती, कलश दर्शन घेण्याची सोय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या मंदिर विकास प्रकल्पाच्या कामांमुळे शनिवार (दि. 14) ते मंगळवार, दि. 17 मार्च असे चार दिवस गाभार्‍यातील अंबाबाई मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, उत्सवमूर्ती तसेच कलश दर्शन भाविकांना घेता येणार आहे. अभिषेक सेवाही सुरू राहणार आहे, अशी माहिती मंदिर देवस्थान व्यवस्थापनाने दिली.

गेल्या एक महिन्यापासून अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पांतर्गत मंदिर आवारात विविध विकासकामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांतर्गत मंदिरातील विविध भागातील दगडी फरशीचे काम सुरू आहे. मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14 ते 17 मार्च या कालावधीत मुख्य पेटी चौक तसेच गाभार्‍यातील दगडी फरशीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित आणि सुबक करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या कालावधीत गाभार्‍यातील अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिराच्या बाहेरील मंडपात उत्सवमूर्ती तसेच कलश प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. भाविकांना तेथेच दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. कामे लवकरात लवकर पूर्ण करून गाभारा दर्शन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT