कोल्हापूर

कोल्हापूर : अंबाबाई सुरक्षा यंत्रणा होणार आणखीन मजबूत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; गौरव डोंगरे : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा यंत्रणा आणखीन अद्ययावत करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सुरक्षा साधनांमध्ये आणखीन भर टाकण्यावर प्रशासनाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टर यासोबतच सुरक्षा रक्षकांचीही संख्या वाढविण्याचा विचार सुरू आहे. अंबाबाईच्या दर्शनाला दिवसा सरासरी 15 ते 20 हजार भाविक येत असतात. सुट्टीच्या काळात ही संख्या पाऊण लाख ते एक लाखापर्यंत पोहोचते. अशावेळी मंदिर सुरक्षेवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

बॅग स्कॅनर

विमानतळावर बॅगांचे स्कॅनिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा वापरली जाणार आहे. धातूसदृश कोणतीही धारदार वस्तू मंदिरात नेण्यास मनाई आहे. असे असतानाही नजरचुकीतून असे हत्यार मंदिरात जाऊ नये, यासाठी बॅगा तपासणारे स्कॅनर प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतील. याठिकाणी बॅगांची तपासणी करून मंदिरात प्रवेश दिला जाईल.

मेटल डिटेक्टर

मंदिराच्या चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टर आहेत. यामध्ये आता नव्या तंत्रज्ञानाच्या मेटल डिटेक्टरची भर पडणार आहे. एका बँकेने यासाठी तयारी दर्शवली असून त्यांच्याकडून देवस्थान समितीला हे डिटेक्टर देण्यात येणार आहेत. यानंतर हे डिटेक्टर प्रवेशद्वारांवर लावले जातील.

वज्र पथक

मंदिराबाहेर शस्त्रधारी पोलिसांसह विशेष पथक तैनात आहे. प्रशिक्षणधारी पोलिसांचे हे पथक 24 तास तत्पर ठेवण्यात आले आहे.

बॉम्बशोध पथक

बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकाकडून दररोज सकाळी व संध्याकाळी तपासणी

सीसीटीव्ही

मंदिर परिसरात 82 कॅमेरे कार्यरत आहेत. ज्याद्वारे सर्व परिसरावर नजर ठेवण्यात येते. सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये कर्मचारी लक्ष ठेवून असतात.

SCROLL FOR NEXT