आ. अमल महाडिक 
कोल्हापूर

Amal Mahadik | सतेज पाटील यांना ओपन भेटतोय; लपून-छपून नाही! : आ. अमल महाडिक

जिल्ह्याच्या हिताच्या निर्णयावर चर्चा करतो

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील व मी जिल्हा बँकेत संचालक आहोत. आमची कुठे ना कुठे तरी भेट होत असते. योगायोगाने एकमेकांना दिसतो, हसतो. या व्यतिरिक्त काहीही राजकीय नाही; पण बँकेच्या हिताचे निर्णय किंवा राजकारणात जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील, त्यावेळी चर्चा करतो. बाकी आमच्या लपून छपून बैठका नाहीत, सर्व ओपन भेटी आहेत, असे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

आ. महाडिक यांनी महापालिकेच्या ताराबाई गार्डन येथील कार्यालयात अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गोकुळची बाब न्यायालयीन आहे. राज्य सरकार, गोकुळ दूध संघ व आम्ही महायुती म्हणून काम करतोय. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून सर्वांनी गोकुळबाबत प्रशासकांना मदत करावी. गोकुळला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. योग्य तो निर्णय सरकार घेईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT