कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्हा परिषेदला दीड कोटीचा निधी : अमल महाडिक

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला दीड कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी आ. अमल महाडिक यांनी दिली. यातून प्रामुख्याने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमधील रस्ते करण्यात येणार आहेत. याशिवाय हातकणंगले तालुक्यातीलदेखील काही रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी, सरनोबतवाडी कृषी कॉलनी ते विमानतळ मार्ग, उचगाव ते राजपल्लू मंगल कार्यालय रस्ता, नंदगावपैकी हंचनाळवाडीपर्यंत रस्ता तसेच वसगडे सोनार मळा तसेच जुने चिंचवाड ते नदी पाणवठा व मौजे वडगाव-नागाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारपर्यंतच्या रस्त्याची कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT