घोसरवाड : येथील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार उघडकीस आला. 
कोल्हापूर

Black Magic Incident | घोसरवाड स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींकडून भानामती व तांत्रिक विधी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमी परिसरात लिंबू, काळ्या बाहुल्या, गुलाल व इतर विधींचे साहित्य आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोसरवाड गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्यामुळे मंगळवारी गावातील संबंधित लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले होते. अंत्यविधीची तयारी करत असताना नागरिकांना स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात संशयास्पद साहित्य दिसले. जवळ जाऊन पाहिले असता तेथे करणी किंवा भानामती करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामध्ये कापलेले लिंबू, टाचण्या लावलेल्या बाहुल्या व गुलालाचा समावेश होता.

हा प्रकार नेमका कोणी, कधी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत माहिती मिळाली नाही. अंधश्रद्धेतून किंवा कोणामध्ये तरी दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असावा, असा संशय आहे. अशाप्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT